Ad will apear here
Next
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची चीनमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड
इचलकरंजी :  संपूर्ण भारतातून डीकेटीईमध्ये टेक्स्टाईलचे शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांची चीनमधील उहान युनिर्व्हसिटीत ‘मास्टर ऑफ फॅशन डिझायनिंग अॅंड इंजिनिअरींग’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. 

उहान युनिर्व्हर्सिटीने शैक्षणिक गुणवत्ता व व्हिडीओ कॉलिंग इंटरव्हयूव्दारे चीनच्या अधिकाऱ्यानी डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. डीकेटीईच्या विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी असलेल्या सामंजस्य करारामुळे डीकेटीईतील बरेच विद्यार्थी आर्थिक कुवत नसतानाही उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे आपले स्वप्न साकार करीत आहेत. 

राकेश खंडेलवाल
चीनमधील उहान युनिर्व्हसिटी हे वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत शिक्षण देणारे आघाडीचे विद्यापीठ आहे.  ही युनिर्व्हसिटी संपूर्ण आशिया खंडातून मोजक्याच विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपसाठी निवड करते.  यावर्षी संपूर्ण भारतातून डीकेटीईचे दोन विद्यार्थी सुरज साखरपे व राकेश खंडेलवाल यांची निवड झाली आहे.सध्या हे विद्यार्थी उहान विद्यापीठामध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. 

सुरज साखरपे
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, सचिव. डॉ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा.एम.वाय. गुडीयावर व प्रा. व्ही.के.ढंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. 

प्राध्यापकांचे मार्गदर्शन व कुटुंबियांचे सहकार्य यामुळेच हे यश प्राप्त झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.  विविध आंतरराष्ट्रीय इन्स्टिटयूट व इंडस्ट्रीजशी असलेल्या सामंजस्य करारामुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यासाठी युरोपबरोबरच चीनमध्येदेखील आता उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याआधीही डीकेटीईचे उमेश पाटील, मोसीन नाईकवडे, उमर इनामदार, राहूल नावीक, शिवराज कारंडे या विद्यार्थ्यांनी उहान येथे शिक्षण संपादन केले आहे. हे सर्व विद्यार्थी विविध ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZRDBH
Similar Posts
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
‘डीकेटीई’च्या प्रा. सचिन लांडगे यांना पीएचडी इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये टेक्स्टाइल केमिस्ट्री विभागात कार्यरत असणारे प्रा. सचिन लांडगे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत पीएचडी इन टेक्स्टाइल इंजिनीअरिंग ही पदवी प्राप्त झाली आहे.
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘ट्रायडेंट’मध्ये प्रशिक्षणासाठी निवड इचलकरंजी : येथील डीकेटीई संस्थेतील टेक्स्टाइल विभागात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या आठ विद्यार्थ्यांची ‘ट्रायडेंट’ या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून ‘ट्रायडेंट’कडून दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाबरोबर रुपये एक लाख इतके विद्यावेतनही देणार आहे.
‘डीकेटीई’मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’मध्ये दिल्लीतील भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांचा मतदार यादीत समावेश व्हावा व त्यांचा मतदार प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रश्‍ननियमावली, पोस्टर प्रेझटेंशन आयोजित

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language